'राजवी ग्रो'चा दीडशे रुपयांचा हप्ता जमा होणार
चेअरमन प्रा. शिवाजीराव सावंत यांची माहिती
माढा : (कटूसत्य वृत्त) तत्कालीन भैरवनाथ शुगर आलेगाव साखर कारखान्याला ज्या ऊस उत्पादकांनी गेल्या गाळप हंगामात ऊस पुरवठा केला होता त्यांना यापूर्वी पंचवीसशे रुपये प्रति टन दिले असून
दसऱ्यानिमित्त उद्या प्रति टन दीडशे रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करणार असून दिवाळीपूर्वीही प्रति टन अजून दीडशे दिले जाणार असल्याची माहिती राजवी ग्रो शुगर पॉवर लिमिटेडचे चेअरमन प्रा. शिवाजीराव सावंत यांनी दिली.
गेल्या गाळप हंगामानंतर यावर्षी भैरवनाथ शुगर आलेगाव हा साखर कारखाना राजवी ग्रो शुगर पॉवर लिमिटेड या कंपनीकडे हस्तांतरित झाला. त्यानंतर लगेचच ऊस उत्पादकांसाठी सकारात्मक पावले उचलत दसऱ्याच्या निमित्ताने प्रति टन दीडशे रुपये चा हप्ता राजवी ऍग्रो शुगर पॉवर कडून जमा होत असल्याने ऊस उत्पादकांनी समाधान व्यक्त केले आहे.
याशिवाय दिवाळीपूर्वी अजूनही प्रति टन दीडशे शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करणार असून यावर्षीही राजवी ऍग्रो शुगर पॉवर लिमिटेड ताकतीने गाळप करणार असल्याचे प्राध्यापक सावंत यांनी सांगितले. तसेच यंदाच्या गाळप हंगामात ही जिल्ह्यातील इतर साखर कारखान्यांच्या बरोबरीने दर देणार असून ऊस उत्पादकांच्या सर्वांगीण प्रगतीसाठी राजवी ग्रो शुगर पॉवर लिमिटेड वचनबद्ध असल्याचे प्रतिपादन प्राध्यापक शिवाजीराव सावंत यांनी केले. यंदा पाऊस चांगला असल्याने विक्रमी ऊस उत्पादन असल्याने ऊस उत्पादक शेतकऱ्यांचा ऊस वेळेत नेणे हे साखर कारखान्यांपुढे मोठे आव्हान असून राजवी ग्रो ची टीम गाळप हंगामाच्या तयारीला ताकतीने लागली असून यावर्षीही गाळप आणि दर दोन्ही बाजू आम्ही भक्कमपणे सांभाळणार असल्याचे प्राध्यापक शिवाजीराव सावंत यांनी सांगितले.
0 Comments