पटवर्धन कुरोली प्रशालेत वह्यांचे वाटप
पटकुरोली (कटूसत्य वृत्त):- सामाजिक बांधिलकी जपत पटवर्धन कुरोली प्रशालेतील विद्यार्थ्यांना प्रभात दूध डेअरीच्या वतीने प्रत्येकी सहा वह्यांचे वाटप करण्यात आले. हा उपक्रम बारामती कॉटन फीडच्या सीएसआर निधीतून राबविण्यात आला.
या प्रसंगी बारामती कॉटन फीडचे प्रतिनिधी उमेश घनवट, विठ्ठल शिरसागर, डॉ. पांढरे, बळीराजा शेतकरी संघटनेचे प्रदेश उपाध्यक्ष ज्ञानेश्वर माऊली जवळेकर, संस्थेचे अध्यक्ष शंकर मलशेट्टी, खजिनदार नंदकुमार पाटील, चेअरमन अनिल सावंत, महावीर नाईकनवरे, शेतकरी मोहन चिंचकर आदी मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमात मान्यवरांनी विद्यार्थ्यांना वह्या वाटताना शिक्षणाचे महत्त्व पटवून दिले. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साधनसामग्रीच्या स्वरूपात दिली जाणारी मदत ही उपयुक्त व कौतुकास्पद असल्याचे वक्त्यांनी नमूद केले.
शाळेचे मुख्याध्यापक शिदसर, सर्व शिक्षकवर्ग तसेच विद्यार्थी मोठ्या संख्येने या कार्यक्रमाला उपस्थित होते. या उपक्रमामुळे प्रशालेतील विद्यार्थ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण होते.
ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शैक्षणिक मदत मिळावी या हेतूने समाजातील विविध संस्था व उद्योगधंद्यांनी पुढाकार घेणे गरजेचे असल्याचे मतही यावेळी व्यक्त करण्यात आले.
0 Comments