Hot Posts

6/recent/ticker-posts

अकलूज येथे महिला व विद्यार्थ्यांसाठी कराओके स्पर्धा संपन्न

 अकलूज येथे महिला व विद्यार्थ्यांसाठी कराओके स्पर्धा संपन्न




अकलूज (कटूसत्य वृत्त):- धनशैल्य शिक्षण संस्था अकलूज व रोटरी क्लब अकलूज यांच्या संयुक्त विद्यमाने महिला व विद्यार्थ्यांची खुली कराओके स्पर्धा तसेच दांडिया नाईट्स हा बहारदार कार्यक्रम कृष्णप्रिया मल्टीपर्पज हॉल अकलूज येथे मोठ्या उत्साहात पार पडला.
             या स्पर्धेत महिला गटातून तब्बल २९ स्पर्धकांनी तर विद्यार्थी गटातून ११ स्पर्धकांनी सहभाग नोंदवला.स्पर्धेचे पर्यवेक्षण डॉ. गायत्री जामदार,राजेंद्र गायकवाड व सौ.पाटील यांनी केले.विविध स्पर्धकांनी आपापली कला खुलून सादर करत उपस्थितांची मने जिंकली.महिला व विद्यार्थी गटातील प्रथम तीन विजेत्यांना करंडक व आकर्षक बक्षिसे प्रदान करून गौरविण्यात आले.
          या कार्यक्रमाचे प्रास्ताविक रोटरी क्लबचे अध्यक्ष केतन बोरावके व अजिंक्य जाधव यांनी केले. यावेळी धनशैल्य शिक्षण संस्थेचे अध्यक्ष डॉ.मनिष गायकवाड,उपाध्यक्षा सौ.पल्लवी गायकवाड,संस्थापिका श्रीमती शैलजा गायकवाड व संचालक  आकाश बनकर उपस्थित राहून स्पर्धक व पाहुण्यांचे आभार मानले.
बक्षिस वितरण सोहळ्यास प्रमुख पाहुणे म्हणून दादासाहेब फाळके पुरस्कार विजेत्या डॉ.श्रद्धा जंवंजाळ,नृत्यरंगम कला मंदिर संस्थापिका सौ.सोनम व्होरा, इनरव्हील क्लब अकलूज अध्यक्षा सौ.मृणाल दोशी, रोटरी क्लब सराटी डीलाईट संचालिका सौ.शितल दळवी व कलामूर्ती डान्स अकॅडमी संस्थापक प्रताप थोरात उपस्थित होते.
         कराओके स्पर्धेनंतर झालेल्या दांडिया नाईट्समध्ये अजय गायकवाड यांच्या कराओके टीमने लाईव्ह सादरीकरण करून उत्सवाला रंगत आणली.यामध्ये सुमारे अकलूज परिसरातील ७०० महिला व विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला,उपस्थितांनी ठेका धरत संगीत व नृत्याचा मनसोक्त आनंद घेतला.कार्यक्रमाचे संपूर्ण आयोजन धनशैल्य विद्यालय गिरझणी व किडझी अकलूज मधील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी पार पाडले.या सोहळ्यामुळे अकलूजमध्ये महिलांना व विद्यार्थ्यांना आपल्या कलेचे व्यासपीठ मिळाले असून, उपस्थितांनी या उपक्रमाचे कौतुक केले.
Reactions

Post a Comment

0 Comments