Hot Posts

6/recent/ticker-posts

जे इतिहास विसरतात, ते भविष्य विसरतात : विनायक खोत

 जे इतिहास विसरतात, ते भविष्य विसरतात : विनायक खोत



अक्कलकोट(कटूसत्य वृत्त):- गड-किल्ले स्वराज्यातील इतिहासाचे पराक्रमाचे शौर्याचे प्रतीक आहेत. गड- किल्ल्यांची निगा, संवर्धनाची गरज आहे. गडकिल्ले कसे पाहावेत, का पाहावेत, गड- किल्ले यांचे प्रकार आपल्या पूर्वजांचे बलिदान यांची स्मृती आठवण्यासाठी गड-किल्ले पहावेत. छत्रपती शिवाजी  महाराज हे स्वराज्याचे पहिले क्रांतिकारी पुरुष आहेत. आपला हा इतिहास शौर्य मंदिरे सर्वांना

सांगण्यास आपण कमी पडत आहोत. आपण हा इतिहास विसरत चाललो आहोत. जे इतिहास विसरतात, ते भविष्य विसरतात. भविष्य घडविण्यासाठी इतिहास माहीत असणे, तो साऱ्यांना सांगणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन शिवाजी ट्रेल दुर्ग संवर्धन संस्था अध्यक्ष विनायक खोत यांनी केले.


ते विवेकानंद प्रतिष्ठान संस्थापक यांच्यावतीने गणेशोत्सवानिमित्त आयोजित व्याख्यानमालेच्या प्रारंभी गुरुवारी पहिले पुष्प गुंफताना बोलत होते. ते पुढे म्हणाले, शिवरायांचा इतिहास सर्वांना सांगण्याचे काम

विवेकानंद प्रतिष्ठानचे संस्थापक आ. सचिन कल्याणशेट्टी प्रतिष्ठान माध्यमातून गणेशोत्सव व्याख्यानमालेतून होत आहे, ही गौरवाची बाब आहे. प्रारंभी गणेशोत्सव व्याख्यानमालेचा प्रारंभ दीपप्रज्वलन व प्रतिमा पूजन सुनील गोरे, मोहन शिंदे, दामोदर शिंगे, गुरुपादप्पा आळगी, राजशेखर उबराणीकर, दत्तात्रय कटारे आदी मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. व्याख्याते विनायक खोत यांचा परिचय कल्पना स्वामी यांनी करून दिला. व्याख्याते - दुर्ग किल्ले जतन संवर्धक स्वच्छता चळवळीचे विनायक खोत यांचा सत्कार समर्थांची प्रतिमा, शाल, वृक्ष देऊन प्रतिष्ठानचे संचालक अशोक येणगुरे

व मुकुंद उत्पात, आकाश पटांगळे आदी मान्यवरांचा प्रतिष्ठान वतीने सत्कार करण्यात आला. याप्रसंगी मल्लिकार्जुन मसुती, महावीर येणगुरे, महेश कापसे, विलास कोरे, मनोहर चव्हाण, प्राचार्य मलकप्पा भरमशेट्टी, खंडेराव घाडगे, सूत्रसंचालक बापुजी निंबाळकर, महेश वागदरे, पप्पू मोरे, शिवलिंगप्पा वाले, अभिजित लोके, नागेश कलशेट्टी, चंद्रकांत दसले, श्रीकांत झिपरे, प्रतिष्ठानचे सदस्य व श्रोते उपस्थित होते.


चौकट 

एलईडी प्रेझेन्टेशनमधून गडकिल्ल्यांची भ्रमंती

महाराष्ट्रातील गड व किल्ले या विषयावर पहिले पुष्प गुंफताना रसिक श्रोत्यांना एलईडी प्रेझेन्टेशनद्वारे व्याख्याते विनायक खोत यांनी महाराष्ट्रातील गड-किल्ल्यांची अक्षरक्षः भ्रमंतीच केली. रसिक श्रोते एक-एक गड व किल्ले एलईडी प्रेझेन्टेशनद्वारा पाहत असता गड-किल्ल्यांची इत्यंभूत माहितीसह शिवरायांचा स्वराज्याच्या निर्मितीसाठी एक-एक गड व किल्ला स्वराज्याच्या निर्मितीत किती महत्त्वाचा आहे, हे विशद केले. स्वराज्य प्राप्तीसाठी दिलेला लढा, शौर्य, इतिहास प्रत्येक गड-किल्ल्याचे महाराष्ट्राच्या इतिहासात महत्त्व श्रोत्यांसमोर उभा केले.


Reactions

Post a Comment

0 Comments