Hot Posts

6/recent/ticker-posts

अखेर निरा देवघर प्रकल्पास हिरवा कंदील... दुष्काळी भाग होणार सुजलाम सुफलाम..!

 अखेर निरा देवघर प्रकल्पास हिरवा कंदील... 

दुष्काळी भाग होणार सुजलाम सुफलाम..! 


माळशिरस (कटूसत्य वृत्त):- बहुचर्चित अनेक वर्ष  दुष्काळी भागाचा रखडलेला प्रकल्प म्हणजे निरा देवघर...!   केंद्र आणि राज्य सरकारच्या संयुक्त विद्यमाने हा रखडलेला प्रकल्प पूर्णत्वास येणार असल्याने या परिसरातील शेतकरी संपन्न होणार असून सुजलम सुफलम परिसर होणार असल्यामुळे सर्वत्र या निर्णयाचे कौतुक होत आहे.   लोकसभा निवडणुकी वेळी जनतेला शब्द दिला होता  तो शब्द पूर्ण करण्यात खऱ्या अर्थाने आज यश मिळालं असल्याचं खासदार रणजीत सिंह निंबाळकर यांनी सांगितले .दि. ३/१० /२०२३ रोजी केंद्रीय जलसंपदा विभागाच्या अर्थ व गुंतवणूक समिती ची दिल्लीत बैठक संपन्न झाली .या बैठकीस  सुश्री देबश्री मुख़र्जी,सचिव, जलशक्ति मंत्रालय भारत सरकार, उदय चौधरी ,निजी सचिव, माननीय जलशक्ति मंत्री भारत सरकार , महाराष्ट्र कृष्णा खोरे विकास महामंडळाचे मुख्य अभियंता गुनाले , नीरा देवघर प्रकल्पाचे कार्यकारी अभियंता कोडुलकर   आदि उपस्थित होते. प्रकल्प केंद्र सरकार व राज्य सरकार यांच्या संयुक्त विद्यमाने पूर्ण करण्याचा निर्णय घेतला आहे .त्यामुळे हा प्रकल्प प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेत #PMKSY मध्ये समाविष्ट करण्याची शिफारस केली आहे .त्यामुळे या प्रकल्पाला केन्द्र शासनाचे अनुदान प्राप्त होईल. त्यापैकी राज्य शासन 40% अनुदान  महाराष्ट्र चे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यापूर्वीच मंजुर केले.  राज्य सरकारने स्वतःच्या वाट्याचा  निधी उपलब्ध करून दिला.  व त्याचे प्रत्यक्षात टेंडर सुरू झाले.  व लवकरच काम सुरू होणार आहे .  पंतप्रधान नरेंद्र मोदी ,   जलशक्ती मंत्री गजेंद्र सिंह शेखावत,  मुख्यमंत्री एकनाथ शिंदे,उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस , उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे व सर्व प्रशासकीय अधिकारी  यांनी या प्रकल्पासाठी विशेष सहकार्य दिल्यामुळेच हा प्रकल्प पूर्णत्वास जाणार आहे.  हा एकूण प्रकल्प ३९६७  कोटी रुपयांचा आहे .. आता हा प्रकल्प या वर्षाच्या मार्च अखेर टेंडर प्रोसेस होऊन प्रत्यक्षात कामाला सुरुवात केली जाणार आहे. केंद्र शासनाकडून 60% निधी उपलब्ध होणार  असल्याने लाभक्षेत्रातील माळशिरस  तालुक्यातील शेवटच्या गावापर्यंत पाणी पोहोचवले जाणार व पंढरपूर, सांगोला या नव्याने लाभक्षेत्रात समावेश झालेल्या कायम दुष्काळी भागाला पाणी मिळणार आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पाण्याच्या प्रश्नावर मतदारसंघात शेवटचा झेंडा रोवला आहे. माळशिरस मतदारसंघातील शेतकरी आणि नागरिकांसाठी हा ऐतिहासिक क्षण असल्यामुळे सर्वांनी या निर्णयाचे कौतुक केले आहे.
Reactions

Post a Comment

0 Comments