सहायता वेलफेअर फाऊंडेशन जपतेय सामाजिक बांधिलकी
अकलूज (कटूसत्य वृत्त):- अकलूजकरांवर अभूतपूर्व असे पाणी टंचाईचे संकट आले असून, अकलूज येथील सहायता वेलफेअर फाऊंडेशन यांनी सुद्धा मोफत पाणी उपलब्ध करून देण्याचा विडा उचलला असल्याचे फाउंडेशनचे अध्यक्ष तथा नगरसेवक मोहसीन शेख यांनी सांगितले.
पाणी हेच जीवन आहे आणि यामुळेच सृष्टी आहे. परंतु निसर्ग कधी चमत्कार करेल हे कोणीही ठामपणे सांगू शकणार नाही किंवा प्रकोप करेल हे सुद्धा कोण ठामपणे सांगू शकत नाही!कारण यावेळी पाच महिने सूर्याच्या प्रखर दाहकतेचा सामना सर्वानाच करावा लागला.जूनचा पाऊस,जुलै महिन्यात सुरू झाला. तत्पूर्वी बऱ्यापैकी धरणातील पाण्याची पातळी बरीच कमी झाली आणि पाण्याचे संकट वाढले, म्हणून आम्हीही खारीचा वाटा उचलला असे अकलूज नगरपरिषदेचे नगरसेवक मोहसीन शेख म्हणाले.
पुढे बोलताना शेख म्हणाले,सहायता वेलफेअर फाउंडेशन, अकलूज यांच्या विद्यमाने प्रभाग क्र. ४ मधील कौलारू शाळेसमोर, हनुमान मंदिर परिसर, जुनी ग्रामपंचायत परिसर, मुल्ला गल्ली, शनी मंदिर-काझी गल्ली तसेच देशमुख गल्ली परिसरातील नागरिकांच्या मागणीनुसार आज मुबलक प्रमाणात पाण्याचे वितरण करण्यात आले.तर प्रभागातील नागरिकांना आगामी काही दिवस पाणीटंचाईचा सामना करावा लागू शकतो? या पार्श्वभूमीवर, घरगुती बोअरवेल धारकांनी आपल्या परिसरातील गरजू नागरिकांना पाणी उपलब्ध करून देत सामाजिक बांधिलकी जपावी, असे आवाहन सहायता वेलफेअर फाउंडेशनचे अध्यक्ष तथा नगरसेवक मोहसिन शेख यांनी केले आहे. तसेच, नागरिकांनी पाण्याचा अपव्यय टाळून पाणी काटकसरीने व जबाबदारीने वापरावे, असेही आवाहन केले.
.png)
No comments:
Post a Comment