Hot Posts

6/recent/ticker-posts

जाणता राजा कला, क्रीडा व सांस्कृतिक मंडळाच्या वतीने रक्तदान शिबिर

 जाणता राजा कला, क्रीडा व सांस्कृतिक मंडळाच्या वतीने रक्तदान शिबिर


अंकोली,(कटूसत्य वृत्त):- मोहोळ तालुक्यातील मौजे ढोक बाभूळगाव येथील जाणता राजा कला, क्रीडा व सांस्कृतिक मंडळाच्या वतीने घेण्यात आलेल्या रक्तदान शिबिरात ८१ जणांनी रक्तदान करून आपला सहभाग नोंदवला.

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती निमित्त ढोक बाभूळगाव येथे जाणता राजा कला क्रीडा व सांस्कृतिक मंडळाच्या वतीने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिराचे उद्घाटन सरपंच शिवाजी पासले आणि पोलीस पाटील मधुकर चव्हाण यांच्या शुभहस्ते करण्यात आले. या कार्यक्रमास मंडळाचे संस्थापक अध्यक्ष नानासाहेब गायकवाड, नूतन अध्यक्ष योगेश धनाजी लोमटे, उपाध्यक्ष किरण काकडे, ज्योतिबा लोमटे, लखन बेदरे, मंगेश चव्हाण, मुकेश चव्हाण, कृष्णदेव खराडे, संतोष खराडे, अमोल भांगे, समर्थ मुळे, किरण अंकुशराव, जयप्रकाश शिंदे, अभिजीत चव्हाण, शेखर नागणे, आकाश तांबिले, अक्षय चव्हाण, बबलू चव्हाण, प्रदीप गव्हाणे, अमोल गव्हाणे व मंडळातील सर्व कार्यकर्ते ग्रामस्थ उपस्थित होते. यावेळी सिद्धेश्वर रक्तपेढी, सोलापूर यांचे मोलाचे सहकार्य लाभले.

Reactions

Post a Comment

0 Comments