Hot Posts

6/recent/ticker-posts

बहुप्रतीक्षेत सांगोला शहरातील भुयारी गटार योजना कामाचे सर्वेक्षणाचा आज शुभारंभ -आमदार शहाजी बापू पाटील

 बहुप्रतीक्षेत सांगोला शहरातील भुयारी गटार योजना कामाचे सर्वेक्षणाचा आज शुभारंभ -आमदार शहाजी बापू पाटील 


      



        


सांगोला  (कटूसत्य वृत्त):- सांगोला शहरातील गेली दहा वर्षे रेंगाळलेला व शहराच्या आरोग्याचा अत्यंत महत्त्वाचा असणारा सांगोला शहर भुयारी गटार योजनेच्या कामाला मंजुरी मिळाली असून आज या योजनेच्या सर्वेक्षणाच्या कामाचा शुभारंभ करण्यात येत आहे अशी माहिती आमदार शहाजीबापू पाटील  यांनी दिली.सन २०१२साली  नगर परिषदेने निविदा मागवून खाजगी कंपनीकडून याचा प्रकल्प अहवाल तयार केला होता व या अहवालाची तांत्रिक तपासणी करण्यासाठी शासनाकडे प्रस्ताव पाठविला होता यावर महाराष्ट्र शासनाने या अहवालाची तांत्रिक तपासणी महाराष्ट्र जीवन प्राधिकरण यांचे कडून न करता आयआयटी मुंबई या संस्थेकडून करण्यास सांगितले यावर गेली दहा वर्षे वारंवार प्रयत्न करूनही या अहवालाचे तपासणी होऊ शकली नव्हती त्यामुळे चालू बाजारभावा नुसार या  प्रकल्पाची किंमत वाढली आहे.आमदार शहाजीबापू पाटील यांनी नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन या योजनेचा नव्याने प्रकल्प अहवाल महाराष्ट्र जीवन प्राधिकरण यांचेकडून करून घेण्यासाठी व या अहवालाची तांत्रिक तपासणी करण्यासाठी मान्यता देण्याची विनंती केली होती. यावर नगर विकास मंत्री मा एकनाथ शिंदे शिंदे यांनी त्वरित मान्यता देऊन लवकरात लवकर महाराष्ट्र जीवन प्राधिकरण यांचे कडून सविस्तर प्रकल्प अहवाल तयार करून घेऊन यास तांत्रिक मान्यता घेऊन सदरचा प्रस्ताव शासनाकडे सादर करण्याचे आदेश दिले आहेत.
             आज  सांगोला भुयारी गटार योजनेच्या सर्वेक्षणाच्या कामाचा शुभारंभ महाराष्ट्र जीवन प्राधिकरण मार्फत वाढेगाव रोड येथील स्मशानभूमी पासून सकाळी ११वाजता करण्यात येणार आहे सर्वेक्षणाच्या कामाचा शुभारंभ सांगोला तालुक्याचे आमदार शहाजीबापू पाटील यांच्या हस्ते होणार असून या कार्यक्रमासाठी मा आमदार दीपकआबा साळुंखे, प्रा पी सी झपके सर, शिवसेना नेते भाऊसाहेब रुपनर, बाबुराव गायकवाड उदयबापू घोंगडे ,नगरपरिषद प्रशासक तथा तहसीलदार अभिजीत पाटील, सांगोला नगरपरिषदेचे मुख्याधिकारी कैलास केंद्रे,महाराष्ट्र जीवन प्राधिकरण चे उप अभियंता श्री रविकांत ढावरे,शिवसेना शहर प्रमुख कमृद्दिन खतीब, राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष तानाजीकाका पाटील, राष्ट्रीय काँग्रेसचे शहराध्यक्ष तोहिद मुल्ला,हे मान्यवर उपस्थित राहणार असल्याची माहिती माजी नगराध्यक्ष रफिक  नदाफ यांनी दिली.


Reactions

Post a Comment

0 Comments