Hot Posts

6/recent/ticker-posts

सोलापुरात उजनी धरण पाणी बचाव संघर्ष समितीचे गनिमी काव्याने आंदोलन

सोलापुरात उजनी धरण पाणी बचाव संघर्ष समितीचे गनिमी काव्याने आंदोलन


            सोलापूर (कटूसत्य वृत्त) :-उजनी धरण पाणी बचाव संघर्ष समितीचे आज सोलापुरात गनिमी काव्याने आंदोलन सुरु केले आहे.उजनी धरणातून इंदापूरला पाणी देण्यासाठी सोलापूर जिल्ह्यातील शेतकरी नेते आणि संघटनांचा तीव्र विरोध आहे. इंदापूरमधील लाकडी-निंबोडी उपसा सिंचन योजनेसाठी  शासनाने 348 कोटी निधी मंजूर केल्याने आंदोलक संतप्त झाले आहेत. राज्यमंत्री व पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांना सद्सद विवेक बुद्धी द्यावी. यावेळी उजनी धरण पाणी बचाव संघर्ष समितीतेर्फे सिद्धेश्वर मंदिरात महाआरती करण्यात आली. यावेळी उजनी धरण पाणी बचाव संघर्ष समितीच्या आंदोलकांना पोलिसानी ताब्यात घेतले. फौजदार चावडी पोलिसांनी ताब्यात घेतले. यापूर्वीही पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या विरोधात शेतकऱ्यांच्याकडवून घोषणाबाजी करण्यात आली होती.उजनी धरणातून इंदापूर 5 टीएमसी पाणी देण्याची योजना असून त्याला सोलापूरकरांचा तीव्र विरोध आहे. उजनी धरणातून इंदापूर तालुक्यातील लाकडी निंबोडी उपसासिंचन योजनेला पाणी देण्यास सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी विरोध केला आहे. धरण होताना इंदापूर तालुक्‍यातील 28 गावे धरणात गेली तर पाच गावे बाधित झाली. धरणासाठी करमाळा तालुक्‍यातील अनेक गावांनाही स्थलांतरित व्हावे लागले. त्यापैकी बहुतांश गावांमधील शेतीला पुरेसे तथा पाणीच मिळत नसल्याची स्थिती आहे.उजनीतील पाण्यामुळे सोलापूर जिल्हा रब्बीच्या हंगामात वाढ झाली आहे. तसेच साखर कारखान्यांचा जिल्हा म्हणून सोलापूर जिल्ह्याची संपूर्ण राज्यात ओळख निर्माण झाली. मात्र तरीही अक्‍कलकोट, दक्षिण सोलापूर, उत्तर सोलापूर, मंगळवेढा, सांगोला या तालुक्‍यातील बऱ्याच शेतकऱ्यांना उजनीचे पाणी मिळू शकलेले नाही. अशी वस्तुस्थिती असतानाही उजनीतून पाच टीएमसी पाणी इंदापूर तालुक्‍यातील 22 गावांना देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. 117 टीएमसी क्षमता असलेल्या या धरणाचे काम 1969 रोजी सुरू झाले. जून 1980 मध्ये धरणाचे काम पूर्ण झाले.

Reactions

Post a Comment

0 Comments