सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त मंत्रालयात राष्ट्रीय एकता दिनाची शपथ - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Monday, November 2, 2026

सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त मंत्रालयात राष्ट्रीय एकता दिनाची शपथ

 

सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त मंत्रालयात राष्ट्रीय एकता दिनाची शपथ



मुंबई(कटूसत्य वृत्त):-   भारताचे माजी गृहमंत्री दिवंगत सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त मंत्रालयात सामान्य प्रशासन विभागाचे प्रधान सचिव डॉ. अतुल पाटणे यांनी प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. तसेच राष्ट्रीय संकल्प दिनानिमित्त दिवंगत माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.

भारतीय एकात्मतेसाठी प्रयत्न करणाऱ्या सरदार वल्लभभाई पटेल यांच्या १५१ व्या जयंतीनिमित्त वर्षभर विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले. राष्ट्रीय एकता दिवसानिमित्त मंत्रालयातील अधिकारी व कर्मचारी यांना प्रधान सचिव डॉ. अतुल पाटणे यांनी शपथ दिली.

यावेळी सहाय्यक कक्ष अधिकारी अमोल चव्हाण, सुनील जाधव, एसीपी उनवणे, वरिष्ठ पोलिस निरीक्षक कोयंडे, गायकवाड तसेच मंत्रालयातील अधिकारी व कर्मचारी  उपस्थित होते.


No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages