मोहोळ नागरी सहकारी पतसंस्थे च्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा...! कौशिक तात्या गायकवाड यांच्या कार्याला मिळाली पोचपावती....!! - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Saturday, October 14, 2023

मोहोळ नागरी सहकारी पतसंस्थे च्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा...! कौशिक तात्या गायकवाड यांच्या कार्याला मिळाली पोचपावती....!!

 मोहोळ नागरी सहकारी पतसंस्थे च्या शिरपेचात आणखी

 एक मानाचा  तुरा...! 

 कौशिक तात्या गायकवाड यांच्या कार्याला मिळाली पोचपावती....!! 

मोहोळ (कटूसत्य वृत्त):- राज्यातील दुर्दम्य इच्छाशक्ती असलेल्या शेतकऱ्याला सलाम करण्यासाठी तसेच सहकाराच्या माध्यमातून देशाच्या विकासाला चालना मिळावी या विचारधारेतून दैनिक नवराष्ट्र च्या वतीने कृषी सहकार हा पुरस्कार उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या शेतकरी आणि सहकारी संस्थांना दिला जातो.

यंदाचा  कृषी सहकार आदर्श पतसंस्था पुरस्कार मोहोळ येथील मोहोळ नागरी सहकारी पतसंस्थेस मिळाल्यामुळे या पतसंस्थेची उंची वाढली असून या पतसंस्थेच्या कारभाराचे आणि मिळालेल्या पुरस्कारामुळे सर्वत्र कौतुक होत आहे. मोहोळ नागरी पतसंस्थेच्या माध्यमातून मोहोळ तालुक्याचे माजी आमदार राजन पाटील यांनी तालुक्यासह सोलापूर जिल्ह्यात सर्वाधिक व्यावसायिकांचे व शेतकऱ्यांचं आर्थिक जाळं विणलं. मोहोळ नागरीचे चेअरमन कौशिक तात्या गायकवाड यांनी गेल्या अनेक वर्षापासून अनेक दुबळ्या घटकांना समृद्ध करण्याचा प्रयत्न करत आहेत.  कृषी उत्पन्न बाजार समिती, चंद्रमौळी औद्योगिक वसाहत व चंद्रमोळी पतसंस्थेच्या माध्यमातून मोहोळ शहर आणि तालुक्याच्या विकासाला चालना मिळत गेली. 

गेल्या अनेक वर्षापासून सहकार क्षेत्रामध्ये या संस्थांचा आधार घेऊन कौशिक गायकवाड यांनी अतिशय पारदर्शक काम उभा केलं आहे. "जे का रंजले गांजले, त्यासी म्हणे जो आपुले" देव तेथेची जाणावा तोचि साधू ओळखावा,"

या संत तुकारामांच्या सुभाषितांचा आधार घेऊन गेल्या अनेक वर्षापासून अनेक रंजल्या गांजलेल्या सर्वसामान्य शेतकऱ्याला मदतीचा हात देऊन त्याच्या जीवनामध्ये आर्थिक भरभराट होण्यासाठी सातत्याने या संस्थांच्या माध्यमातून प्रयत्न करत असल्यामुळेच त्यांना मिळालेला हा पुरस्कार त्यांनी केलेल्या कामाची पोचपावती असल्याचं कार्यकर्त्यांनी सांगितले

भारत हा शेतीप्रधान देश असून भारतीय अर्थव्यवस्थेला मजबूत करण्याचे काम शेतकरी राजा कष्ट करून करतोय. म्हणूनच शेतकऱ्याला जगाचा पोशिंदा असे म्हणतात. शेतीचा शोध सिंध संस्कृतीमध्ये एक स्त्रीने लावला असं मानलं जातं. कृषी क्षेत्रातील विकासाला शेतकरी वर्गाचे मोठे योगदान आहे. कारण शेतीमुळेच उत्क्रांती झाली आहे. कृषी व सहकार क्षेत्राचा चेहरा मोरा बदलणाऱ्या कर्तृत्ववान प्रयोगशील व्यक्ती, कर्तृत्ववान संस्था या पुरस्काराने सन्मानित करण्यात येत असते यंदा विविध मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये  मोहोळ नागरी सहकारी पतसंस्थेस मुंबई येथील हॉटेल ताज या ठिकाणी देशाचे राज्यसभा सदस्य प्रफुल्ल पटेल, महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, दिलीप वळसे पाटील, सहकार मंत्री धनंजय मुंडे आदी मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत देण्यात आला. 

हा गौरव सोहळा शेतकरी वर्ग, सहकारी क्षेत्र,  आणि संस्थेस निश्चितच प्रेरणादायी ठरला. माजी आमदार राजन पाटील यांनी उभा केलेल्या मोहोळ नागरी सहकारी पतसंस्थेच्या या यशामध्ये कौशिक गायकवाड यांचाही सिंहाचा वाटा आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages